Pune Crime News : सावकारी प्रकरणी दोन जणांना अटक

एमपीसी न्यूज – सावकारी केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. याप्रकरणी एका महिलेने पोलीसात तक्रार केली होती.

 

शेऴ्या बकर्यांचा व्यवसाय करण्यासठी म्हणून तक्रारदार महिलेने शरीफ जमादार आणि अरशान मणियार यांच्याकडून 40 टक्के महिना व्याजदराने कर्ज घेतले होते. त्यामुळे तक्रारदार महिलेच्या पतीकडून या दोघांनी व्याजापोटी 17 लाख रुपये घेतले.त्याशिवाय पैसे उसने घेतल्याबाबत नोटराईज करार केले. त्याशिवाय तारण म्हणून घर   नोटराईज कराराने घेतले.

जमादार आणि मणियार यांनी तक्रारदार यांच्या पतीकडे व्याजाची रक्कम देण्याकरीता तगादा लावला होता.पैसे न दिल्यास घर खाली करून घराचा ताबा देण्याकरीता शिवीगाऴ करुन धमकिवल्याची तक्रारदार यांनी तक्रार दिल्याचे लोणीकाळभोर पोलीसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियमाव्दारे गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.