Pune Crime News : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका महिलेसह दोघांना अटक

एमपीसी न्यूज- अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका महिलेसह दोघांना गुन्हे (Pune Crime News) शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना नवले ब्रिज परिसरात कारवाई करून पकडले असून, त्यांच्याकडून तब्बल 11 लाख रुपयांचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला आहे.

 शरण बसवराज पाटील (वय 43) व 44 वर्षीय महिला यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News : पुणे विद्यार्थी गृहाच्या पदाधिकाऱ्याला ठार मारण्याची धमकी

शहरात अमली पदार्थ तस्करांचे जाळे वाढत जात असून, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. यादरम्यान, महिला व तिचा साथीदार अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे व त्यांच्या पथकाने या दोघांना सापळा रचून पकडले. झडती (Pune Crime News) घेतली असता त्यांच्याजवळ 11 लाख रुपयांचा एमडी हा अमली पदार्थ मिळाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.