Pune Crime News : नाशिकच्या दोन गांजा तस्करांना पुण्यात अटक, चौदा लाखांचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज – नाशिक येथून आलेल्या दोन गांजा तस्करांना लोहगाव वाघोली रोडवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोन यांनी शनिवारी (दि.11) अटक केली. त्यांच्याकडून 14 लाख 35 हजार किंमतीचा 71 किलो 755 ग्रॅम गांजा व टेम्पो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रविण बाळासाहेब वायसे (वय 31, उत्तमनगर, नाशिक) व योगेश शशिकांत महाजन (वय 25, रा. पाथर्डी फाटा, पांडुरंग चौक, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी नाशिक येथून एम एच 15 जी व्ही 7808 या टेम्पो मधून गांजा घेऊन आले होते. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला याबाबत माहिती मिळताच लोहगाव वाघोली रोडवरुन त्यांना ताब्यात घेतले. आरोपींवर एन.डी.पि.एस. ॲक्ट अंतर्गत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 71 किलो 755 ग्रॅम गांजा व टेम्पो असा एकूण 32 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.