Pune Crime News : कर्वे रस्त्यावरील महिला सेवाग्राम संस्थेतून दोन मुली बेपत्ता

एमपीसीन्यूज : कर्वे रस्त्यावरील एका संस्थेतून दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत कर्वे रस्त्यावरील कुसुमबाई मोतीचंद महिला सेवाग्राम संस्थेतील अधिकारी महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संस्थेतील दोन मुलींना कोणीतरी फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय तक्रारदाराने फिर्यादीत व्यक्त केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.