Pune Crime News : क्रिकेट बेटिंग प्रकरणी पुण्यात दोन आंतरराष्ट्रीय बुकी ताब्यात, 1 कोटी जप्त

एमपीसी न्यूज – पुण्यात दोन आंतरराष्ट्रीय बुकींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे एक कोटी रूपायांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड आणि समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश भुताडा आणि अशोक देहुरोडकर असे ताब्यात घेतलेल्या दोन बुकींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांना शहरात क्रिकेटवर बेटिंग होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी मार्केटयार्ड आणि समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी करत दोघांना ताब्यात घेतले आहे. भुताडा हा देशातील बडा बुकी म्हणून ओळखला जातो. याप्रकरणात अनेक बडी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, याप्रकरणी अजून तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.