Pune Crime News : मार्केटयार्डमध्ये किरकोळ वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज – पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकरनगरमध्ये किरकोळ कारणावरून दोघांवर कोयत्याने वार करीत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यात दोघेही गंभीर जखमी झाले असू त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली. याप्रकरणी जखमी अरबाज शेख (वय 22) याने तक्रार दिली असून बापू भीमा भालशंकर (वय 23) याला अटक केली आहे. तर त्याचा एक साथीदार पसार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांना ओळखतात. घटना घडली त्या दिवशी फिर्यादी हा मित्र नितीन सुतार व अतिक बागवान यांच्यासोबत जात होता. यावेळी त्याठिकाणी आलेल्या आरोपींनी त्यांना अडवले आणि आमची गाडी बंद का पाडली ? अशी विचारणा करीत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत कोयत्याने वार केले. तर मध्यस्थी करणाऱ्या इतर दोघांनाही आरोपींनी मारहाण केली.

भरवस्तीत हा प्रकार घडल्याने आंबेडकर नगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. अधिक तपास मार्केटयार्ड पोलीस करत आहेत.ल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.