Pune Crime News : आणखी एक नकोशी ! दोन महिन्यांच्या चिमुरडीला मातापित्यांनी दर्ग्यात सोडले

0

एमपीसी न्यूज – पुण्याच्या चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दर्ग्यात दोन महिन्याच्या चिमुरडीला आईवडिलांनीच उघड्यावर सोडल्याची घटना उघडकीस आलीय. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.

चंदनगर पोलीस ठाण्याच्या दामिनी मार्शलने या चिमुरडीला ताब्यात घेत तिची शुश्रूषा केली. चंदन नगर पोलीस या चिमुरडीच्या आईवडिलांचा शोध घेत आहे.

खराडीतील एका दर्ग्यात एका लहान मुलीला अज्ञात व्यक्तीने उघड्यावर सोडले असल्याची माहिती चंदननगर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दामिनी पथकाच्या महिला पोलीस कर्मचारी उज्ज्वला बनकर आणि सुवर्णा वाळके यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन या चिमुरडीला ताब्यात घेतले. तिला पोलीस ठाण्यात आणून बाटलीतील दूध पाजले. या चिमुरडीला उघड्यावर टाकून देणाऱ्या मातापित्यांच्या शोध पोलीस घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.