Pune Crime News : तळजाई टेकडीजवळ दोघांकडून दोन पिस्टल, दोन काडतूस जप्त
गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई
एमपीसीन्यूज : पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोघा तरुणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 1 लाख 22 हजार रुपये किमतीची दोन पिस्टल आणि दोन काडतूस जप्त केली. तळजाई टेकडीजवळ ही कारवाई करण्यात आली.
योगेश गणेश बोरगे (वय 23, रा. धनकवडी, पुणे) ऋषिकेश राजाभाऊ गरुड (वय 22, रा. पद्मावती, सहकारनगर, पुणे) अशी अटक आरोपीची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार सचिन जाधव, प्रशांत गायकवाड व दत्ता सोनावणे यांना माहिती मिळाली की, दोन तरुण कोणावर तरी प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने तळजाईटेकडी येथे मुख्य रस्त्यावर जागा बदलत फिरत आहेत.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे सापळा लावला. त्यावेळी दोघे जण संशयितरित्या थांबलेले आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली. यामध्ये त्यांच्याजवळील दोन पिस्टल, दोन काडतूस जप्त करण्यात आली.
या दोन्ही आरोपींविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम 3(25) मपोका 37(१)135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना सहकारनगर पोलिसांचा ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार सचिन जाधव, दत्ता सोनवणे, प्रशांत गायकवाड, इम्रान शेख, महेश बामगुडे, अशोक माने, शशीकांत दरेकर, सतिश भालेकर, जितुसिंग वसावे यांच्या पथकाने केली.