Pune Crime News : कुप्रसिद्ध बचक्या टोळीतील दोन दुचाकी चोरट्यांना अटक; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते दोघेही पळून जाऊ लागले. पोलिसांनी तात्काळ त्या दोघांनाही ताब्यात घेतले.

एमपीसीन्यूज : शेल्टर होममध्ये राहून रात्रीच्या वेळी वाहने चोरणाऱ्या कुप्रसिद्ध बचक्या टोळीतील दोन सदस्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी असा एकूण अडीच लाखांचा मूडीमल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून वाहन चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले.

विष्णु भाऊराव कुंडगीर ( वय – २१, सध्या रा. पुणे, मूळ गाव खेर्डा, तालुका उदगीर, जि. लातूर), पवन व्यंकट पाटील ( वय – २०, रा. सध्या पुणे, मूळगाव सावता माळी चौक, निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर ) अशी अटक चोरट्यांनी नावे आहेत.

या दोन्ही आरोपींवर पुणे पोलीस आय्क्तालयाच्या रेकॉर्डवरीन गुन्हेगार आहे. त्यांच्यावर या पूर्वी वर्गवारगळया पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

हडपसर पोलीस ठाण्यातच उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस नाईक नितीन मुंढे, शिपाई प्रशांत टोणपे पुणे-सोलापूर महामार्गावर घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी संशयित इसम आणि वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी एका दुचाकीवरून दोघे जण वेगाने येताना दिसले.

पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते दोघेही पळून जाऊ लागले. पोलिसांनी तात्काळ त्या दोघांनाही ताब्यात घेतले.

त्यांच्याजवळील हिरो होंडा शाईन दुचाकीबाबत चौकशी केली असता ती दुचाकी सहा ते सात दिवसांपूर्वी हडपसर येथील एका सोसायटीच्या पार्किंगमधून चोरली असल्याची कबुली दिली. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान , या दोघांनी पुणे आणि हडपसर परिसरात वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली देत दिली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या एकूण दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच हे दोघेही शेल्टर होमध्ये राहून रात्री वाहन चोरी करीत असल्याचेही उघडकीस आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.