Pune Crime News : दोन वाहन चोरट्यांना अटक; चोरीची पाच वाहने हस्तगत

एमपीसीन्यूज : वाहन चोरी करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे दिड लाखाच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

अभिषेक नागेश कांबळे (19, रा. उंब-या गणपती जवळ, भवानी स्विट मार्ट शेजारी, धायरी ) व पवन युवराज कांबळे ( 22, रा. व्हि. आय. टी. कॉलेजजवळ, बिबवेवाडी ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस उपनिरिक्षक नितीन शिंदे व तपास पथकातील पोलीस कर्मचारी असे वाहन चोरीस प्रतिबंध व्हावा म्हणून पेट्रोलिंग व वाहन चेकींग करीत होते. दरम्यान तपास पथकातील पोलीस अंमलदार निलेश खोमणे व समिर बागसिराज यांना खबर मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चो-या करणारी मुले चोरलेल्या एका ॲक्‍सेस दुचाकीसह कात्रज -कोंढवा रोड येथील कात्रज स्मशानभुमी समोर थांबलेली आहेत.

त्यानुसार स्टाफने कात्रज स्मशानभूमी येथे जाऊन पाहणी केली. त्यावेळी पोलिसांना पाहून ॲक्‍सेस गाडीवर असलेले दोघेजन गाडीसह पळून जाऊ लागले होते. मात्र, पोलीस पथकाने त्यांना शिताफीने पकडून ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यात असलेल्या ॲक्‍सेस गाडी बाबत तपास केला असता. सदर गाडी त्यांनी कात्रज येथील किनारा हॉटेल समोरुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या विरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.

अधिक तपासात आरोपी अभिषेक नागेश कांबळे याने यापूर्वी भारती विद्यापीठ व वानवडी परिसरातून वाहने चोरी केल्याचे कबुल केले. चोरलेल्या दोन ऍक्‍टीव्हा, एक होंडा शाईन व एक डिओ गाडी अशा चार दुचाकी गाडया लपवलेले ठिकाण दाखवले. त्याच्याकडून चार गाडया जप्त केल्या.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील एकूण चार गुन्हे व वानवडी पोलीस स्टेशनकडील 1 असे एकूण 5 वाहनचोरी गुन्हे अटक आरोपींकडून उघडकीस आणत एकूण 1 लाख 50 रुपये किमतीच्या गाडया जप्त केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.