Pune Crime News : पोलिस ठाण्याजवळील दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद

एमपीसीन्यूज : खडक पोलिसांनी एका धाडसी चोराला बेड्या ठोकल्या. हा चोरटा पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर उभ्या केलेल्या दुचाकी हेरायचा आणि त्यानंतर त्या चोरून न्यायचा.

गणेश शंकर कानडे (वय ३१, रा. ताडीवाला रस्ता) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी येरवडा परिसरातून त्याला अटक केली.

_MPC_DIR_MPU_II

शुक्रवार पेठेतील सुभाषनगरमधील घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी खडक पोलिसांकडून तपास सुरू असताना दुचाकी चोरटा येरवडा परिसरात असल्याची माहिती पोलीस शिपाई हिंमत होळकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून गणेश कानडे याला अटक केले. चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी, विठ्ठल पाटील, शरद पवार, हिंमत होळकर, किरण शितोळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.