Pune Crime News : हातात कोयते घेऊन सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणे भोवले, दोन तरुणांना अटक

एमपीसी न्यूज – कोयते, तलवार आणि पालघन हातात घेऊन त्याचा व्हीडीओ करून सोशल मिडीयावर व्हायरल करणं दोन तरूणांना चांगलच भोवले आहे. पुणे पोलीस, गुन्हे शाखेच्या युनिट सहाने वाघोली आणि वानवडी येथून शुक्रवारी (दि.03) दोघांना ताब्यात घेतले.

रोहन अनिल देगडे (वय 24, रा. रामटेकडी, वानवडी, पुणे) आणि राहुल मलाप्पा चौगुले (वय 19, रा. वाघेश्वरी झोपडपट्टी, वाघोली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. दोघांच्या घरात प्रत्येकी कोयता व पालघन मिळून आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपींनी हातात कोयता, पालघन यासारखी घातक हत्यारे हातात घेऊन व्हीडीओ तयार केला व तो सोशल मीडियावर व्हायरल केला. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या या व्हीडीओच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांवर गुन्हा दाखल केला असून, पुणे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.