Pune Crime News : सराईत वाहनचोराला अटक, 5 दुचाकी जप्त; सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या सराईताला सिंहगड पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून 1 लाख 50 हजारांच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. साबीर इस्लामउददील अलम (वय 19, रा. धायरी रोड नऱ्हे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

सिंहगड पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रालिंग करीत होते. त्यावेळी वडगाव बुद्रूक परिसरात एकजण चोरीची दुचाकी घेउन येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार आबा उत्तेकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून साबिरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ताब्यातील दुचाकी नवले ब्रिज परिसरातून चोरल्याची कबुली दिली.

साबिरने सिंहगड रोड, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 5 दुचाकी वाहने चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर पोलीस आयुुक्त डॉ. संजय शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, मोहन भुरुक, आबा उत्तेकर, राजेश गोसावी, शंकर कुंभार, उज्ज्वल मोकाशी, सचिन माळवे, दयानंद तेलंगेपाटील, धनाजी धोत्रे, अविनाश कोंडे, निलेश कुलये, किशोर शिंदे, रफिक नदाफ, सागर भोसले यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.