Pune Crime News : दहशत माजवण्यासाठी बिबवेवाडीत वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – दहशत पसरविण्यासाठी बिबवेवाडीतील एका पेट्रोलपंपासह परिसरातील मोटारी आणि दुचाकींची तोडफोड केल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांना शोधण्याचे काम सुरू आहे.

हल्लेखोरांना महेश सोसायटी चौक परिसरातील एका पेट्रोलपंपावर हुल्लडबाजी केली. त्यानंतर परिसरातील मोटारींसह दुचाकींची तोडफोड करून नुकसान केले आहे. काही दिवसांपुर्वी परिसरातील दोन रिक्षांची तोडफोडीची घटना ताजी असतानाच काल मध्यरात्री हल्लेखोरांनी पुन्हा वाहनांची तोडफोड केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

पार्किंगला जागा नसल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न टोळक्याकडून केला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.