Pune Crime News : अल्पवयीन मैत्रीणीवर बलात्कार करून व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पाठवले, अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून लग्नाच्या आमिषाने तिच्यावर वारंवार बलात्कार करून दोघांचे अश्लील व्हिडीओ तयार करून ते इन्स्टाग्रामवर पाठवणाऱ्या 17 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या 53 वर्षीय आईने याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 26 फेब्रुवारी ते 21 जुलैच्या कालावधीत हा प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी आणि आरोपी तरुणाची इन्स्टाग्राम अकाउंटवर ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीचा पाठलाग करून तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर दोघांचे एकत्र अश्लील व्हिडिओ तयार करून त्यावर गाणे लावून ते पीडितेच्या आणि स्वतःच्या इन्स्टाग्रामवर पाठवले.

हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो आणि आयटी अ‍ॅक्ट कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.