Pune Crime News : सातारच्या सराईत गुन्हेगाराकडून पुण्यात गावठी कट्टा जप्त

एमपीसी न्यूज – पुण्यातील मंगळवार पेठेत एकाकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. 

समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई हेमंत पेरणे यांना मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार पेठेत बारणे रस्ता येथे एक संशयित इसम कमरेला पिस्टल लावून उभा होता. पाेलीस उपनिरीक्षक विशाल माेहिते यांचे पथकाने त्या ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करत संबंधित इसमास शाेधून काढून जेरबंद केले. आकाश भगवान त्रिभुवन (वय-25,रा.बालेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे.

त्याचे अंगझडतीत त्याच्या उजव्या बाजुच्या कमरेस पॅन्टच्या आत खाेचलेला 30 हजार रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा व काडतूस मिळून आले आहे. याप्रकरणी त्याच्यावर समर्थ पाेलीस ठाण्यात आर्म्स अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराेपी विरुद्ध सातारा जिल्ह्यात चार गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.