Pune Crime News: वानवडी गोळीबारातील ‘तो’ आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी एका वाळू सप्लायर वर गोळीबार करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

राजेश भिकू पडवळ (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. या घटनेत मयूर विजय हांडे हा वाळू व्यावसायिक जखमी झाला होता.

मयूर हांडे हे वाळू व्यावसायिक आहेत. तीन दिवसांपूर्वी ते वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीराम चौकात थांबले होते. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या आरोपीने त्यांच्यावर गोळीबार करून पळ काढला होता. या घटनेत हांडे यांच्या गालाला गोळी लागून गेल्याने ते जखमी झाले होते.

दरम्यान आठवडाभरात दोनदा भरदिवसा गोळीबार झाल्याने पोलीस दलात खळबळ माजली होती. त्यामुळे वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान गुरुवारी आरोपी बिबवेवाडी परिसरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने गोळी झाडल्याची कबुली दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III