Pune Crime News : मित्रांसोबत शय्यासोबत करण्यासाठी पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : दीड वर्षापूर्वी प्रेम विवाह करून घरात आणलेल्या पत्नीने दारुड्या मित्रांसोबत शय्यासोबत करावी यासाठी तिला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडित 19 वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पीडित महिलेच्या पतीसह त्याचे चार मित्र सुरज कांबळे, करण खडसे, तानाजी शिंदे आणि विशाल माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच सर्व आरोपी पसार झाले असून लोणी काळभोर पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी पती यांचा दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. आरोपी पती दौंड येथील एका कंपनीत कामाला होता. कोरोना काळात नोकरी गेल्याने तो घरीच बसला होता. या काळात त्याची इतर आरोपींशी ओळख झाली. आरोपी पतीच्या घरात बसूनच ते दररोज दारू प्यायचे.

_MPC_DIR_MPU_II

काही दिवसांपूर्वी आरोपीने दारू पिल्यानंतर पत्नीला मित्रांसोबत शय्यासोबत करण्यास सांगितले. परंतु तिने त्याला नकार दिल्याने तिला बेदम मारहाण करण्यात आली.

दरम्यान, हाच प्रकार सोमवारी (19 ऑक्टोबर) परत घडला. पीडित महिलेने मित्रांसोबत शय्यासोबत करण्यास नकार दिल्याने आरोपीने तिला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. जवळच राहणाऱ्या घरमालकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करून तिला सोडवले.

त्यानंतर पीडित महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

अधिक तपास पोलिस निरीक्षक सूरज बंडगर करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.