Pune Crime News: पत्नीने सांगितले मटन बनवण्यास उशीर लागणार, पतीने ठोसा मारून पाडले दात

एमपीसी न्यूज – मटन बनवण्यासाठी उशीर लागणार असल्याचे सांगितल्यानंतर राग आलेल्या पतीने पत्नीला शिवीगाळ करत तिच्या तोंडावर ठोसा मारून दात पाडले. पुण्याच्या औंध परिसरात दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. त्यानंतर पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पती विरोधात चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी प्रभाकरन नाडार (वय ४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता नाडार (वय ४०) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता आणि प्रभाकरन पती-पत्नी असून औंधगावात राहायला आहेत. दोन दिवसांपुर्वी प्रभाकरन दारु पिऊन घरी मटण घेऊन आला होता.

त्याने कविता यांना मटण बनवून देण्यास सांगितले. मात्र, पत्नीने दीड तासानंतर मटण बनवून देते असे प्रभाकरनला सांगितले. त्याचा राग आल्यामुळे त्याने कविता यांना शिवीगाळ करुन हाताने तोंडावर ठोसा मारला. त्यामुळे कविताचे दात पडून दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार काटम तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.