Pune Crime News : जेवण न दिल्याने पत्नीचा गळा आवळून खून, रिक्षा चालक पतीला अटक

एमपीसी न्यूज – जेवण न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून (Pune Crime News) केला. पुण्याच्या अप्पर इंदिरानगर परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक केली आहे.

सविता संदीप औचिते (वय 32) असे गळा आवळून खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर आरोपी पती परशुराम जोगण (वय 38) याला अटक केली आहे. गणेश दत्तात्रय शिंदे (वय 38) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

Pune Crime News : पुण्यातील प्रसिद्ध मॉलमध्ये महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती हा रिक्षा चालक आहे. भाड्याची रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. तर मयत महिला ही त्याची दुसरी पत्नी आहे. रविवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले. मयत पत्नीने दारू पिली होती. तसेच तिने त्याला जेवणही दिले नव्हते. याचाच राग मनात धरून आरोपीने लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तिचा खून केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.