Pune Crime News : मित्राच्या मदतीने पत्नीचे चोरले दागिने; पतीसह मित्रास अटक

एमपीसी न्यूज – मद्यपानासाठी पैसे नसल्याने स्वत:च्या बायकोचे दागिने आणि पैसे चोरल्याची घटना बिबवेवाडी येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी फिर्यादी महिलेच्या पतीसह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.

 

याबाबतची माहिती अशी, घराचा दरवाजा उघडा असताना चोरट्याने स्टीलच्या डब्यातील टॅप्स, डोरले, नथ, मणी असे ऩऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि पाच हजार रुपये रोख असा एकूण 37 हजार रुपयांचा ऎवज चोरीला गेला. याबाबत संबंधित महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

 

या प्रकरणातील गुन्ह्यातील आरोपीचा तपास अधिकारी आणि पोलीस ठाण्याचे तपास पथक समांतर करीत होते. हा गुन्हा फिर्यादीचा पती आणि त्याच्या मित्राने केल्याची माहिती समोर आली.त्यामुळे फिर्यादी महिलेचा पती रोहित अशोक बनसोडो (वय 32, रा. अण्णा भाऊ साठे नगर, बिबवेवाडी) आणि त्याचा मित्र संदिप शिवाजी जाधव (वय 27, रा.टिळेकर नगर, कात्रज-कोंढवा रोड कोंढवा) यांना अटक करण्यात आली आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहीत आणि संदिप या दोघांना मद्याचे व्यसन होते.फिर्यादीच्या पतीकडे पैसे नसल्याने त्याने मित्राच्या मदतीने पत्नीचे दागिने चोरले.पोलीसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करीत आहेत. पोलीसांनी या दोघांकडून 41 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.