Pune Crime News : कुत्रा चावल्याच्या वादातून कोयत्याचा धाक दाखवून महिलेला शिवीगाळ, घरासमोरील वाहनांची केली तोडफोड

एमपीसी न्यूज – मावस भावाला कुत्रा चावल्याचा जाब विचारणाऱ्या या महिलेला पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुरसुंगी येथील हरपळे नगर येथे हा प्रकार घडला. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्तिकी भुजबळ, प्रशांत देवडे, राहुल कांबळे आणि अन्य तीन ते चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिता अर्जुन नाईक (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा मावस भाऊ दुर्गेश गायकवाड यांना आरोपी कार्तिकी भुजबळ हिचा पाळीव कुत्रा चावला होता. यावरून फिर्यादी आणि कार्तिकी गायकवाड यांच्यात वादावादी झाली होती. याच वादाच्या रागातून कार्तिकी गायकवाड हिने अन्य आरोपींना सोबत घेऊन फिर्यादीचे घरासमोर बेकायदा जमाव जमवून, हातात कोणते घेऊन सूर्या तिला शिवीगाळ केली आणि तुझ्या घरासमोर गाड्यांची तोडफोड करून अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान केले. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.