Pune Crime News : पोलीस ठाण्यातच महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी बोलवलेल्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील महिला स्वच्छतागृहातील काच फोडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल दुपारी घडली आहे.

उज्ज्वला भाऊ चोरगे (वय 30) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई पूजा लोंढे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी पोलिसांनी उज्ज्वला यांना पोलीस ठाण्यात बोलवले होते. त्यानुसार उज्ज्वला काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यातील महिला स्वच्छतागृहात जाऊन लघुशंका करण्याचा बहाणा करीत आतील आरशाची काच फोडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.