Pune Crime News : सख्खे शेजारी पक्के वैरी ! टेरेसच्या वादातून महिलेला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – घराच्या टेरेस वरून निर्माण झालेल्या वादानंतर शेजारी राहणाऱ्या महिलांनी एका महिलेला बेदम मारहाण केली. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमवार पेठेत हा प्रकार घडला. याप्रकरणी मनीषा प्रशांत शिंदे (वय 45) यांनी फिर्याद दिली असून अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंजना जगन्नाथ लांडगे, रूपाली सुदर्शन लांडगे, रागिनी ब्रिजपाल राठोड, गोटी उर्फ रूपाली दत्तात्रय खोपडे, सिंडेला विक्रांत कोतवाल, केशकीला राजश्री कुशवाह, अर्चना संजय अगरवाल, रश्मी अमर कांबळे, सरोज तेजस शर्मा, सुदर्शन जगन्नाथ लांडगे आणि विक्रांत आर कोतवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांनी सोमवार पेठेतील सिताराम पार्क, सी विंग मधील 601 फ्लॅट 2020 रोजी राजू सिताराम लांडगे यांच्याकडून खरेदी केला आहे. त्यांचा स्लॅब लिकेज होत असल्यामुळे त्यांनी राजू लांडगे यांना नीट करून द्यावे यासाठी सांगितले होते. परंतु तो नीट न करता राजू लांडगे यांनी तो विकत घ्यावा, असे फिर्यादीला सांगितले होते. त्यानंतर फिर्यादीने टेरेस विकत घेऊन त्याला लोखंडी ग्रील लावले होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी फिर्यादी या टेरेसवर गेल्या असताना रंजना लांडगे त्याठिकाणी आल्या आणि या टेरेसची मालकीण मी आहे असे सांगत तुम्ही लावलेले ग्रील काढून टाका नाहीतर मी तोडून टाकेल असा दम दिला आणि फिर्यादी यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर दुपारी वरील सर्व आरोपी टेरेसवर बेकायदेशीरपणे घुसले आणि यातील काही महिलांनी हातात हातोडा, लोखंडी सळई घेऊन फिर्यादीच्या हातावर, पाठीवर मारहाण केली. फिर्यादी यांचा मुलगा त्यांना वाचवण्यासाठी आला असता काही आरोपींनी त्याला दिली मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.