Pune Crime News : ट्रॅक्टरच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रॅक्टरच्या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. चढावर ट्रॅक्टरचा वेग कमी झाला अन् तितक्यात चालकाने गिअर बदलला. यामध्ये ट्रॅक्टरने अचानक झटका दिला अन् ही महिला खाली पडून चाकाखाली सापडली. चाक छातीवरून गेल्याने महिलेचा मृत्यू झाला.

नंदा अशोक यादव (वय 45) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक महावीर अर्जुन पटेकर (वय 52) याला वानवडी पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मृत नंदा जाधव या वानवडी परिसरातील तरवडे वस्ती येथे राहतात. त्यांच्या घरात पावसाचे पाणी येत असल्यामुळे पार्किंगमध्ये त्यांना कोबा करायचा होता. यासाठी साहित्य घेण्यासाठी त्या मंगळवारी हडपसर परिसरातील एका दुकानात गेल्या होत्या. तेथे त्यांनी वाळू, विटा व इतर साहित्य खरेदी केले आणि चेक घेऊन जाण्यासाठी भाड्याने ट्रॅक्टर घेतला होता. हे सर्व साहित्य ट्रॅक्टर मध्ये टाकून त्या ट्रॅक्टर मध्ये बसूनच घराच्या दिशेने येत होत्या.

दरम्यान घराकडे जात असताना रस्त्यात ट्रॅक्टर चढावर असताना नंदा यादव या खाली पडल्या आणि ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्या. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आला वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.