Pune Crime News : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज- सेनापती बापट रस्त्यावर मध्यरात्री दुचाकीस्वाराने महिलेचा पत्ता विचारण्याचा बहाणाकरून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार ( Pune Crime News ) समोर आला. महिलेने आरडाओरडा करताच दुचाकीस्वार पसार झाला. सेनापती बापट रस्त्यावर साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात 27 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

MPC News Podcast 31 January 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

त्यानुसार, अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. महिला दुचाकीने शिवणे परिसरात निघाल्या होत्या. त्या रत्ना हॉस्पीटलसमोर आल्यानंतर समोरून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना डेक्कन कुठे आहे असा प्रश्न विचारत , अचानक  त्यांच्याशी अश्लील चाळे केले. महिलेने आरडाओरडा करताच त्याने तेथून पळ काढला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.