Pune Crime News : बुधवार पेठेत घरफोडी करणाऱ्या सराईत महिला जाळ्यात

एमपीसी न्यूज – पुण्याच्या बुधवार पेठेत घरफोडी करणाऱ्या दोन सराईत महिलांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 25 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

चोरट्या महिलांनी बुधवार पेठेतील पालेकर वाड्यातून दागिन्यांची चोरी केली होती. रेश्मा रज्जाक शेख (रा. मंगळवार पेठ) आणि अनिता नारायण हजारे (रा.कामगार पुतळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रूपाली कोकरे यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

फिर्यादी रूपाली कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी महिला चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून 25 हजारांचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा शोध घेतला जात होता. त्यावेळी घरफोडी करणाऱ्या दोन सराईत महिला असल्याची माहिती पोलीस अमंलदार अभिनय चौधरी, ऋषिकेश दिघे आणि हनीफ शौकत शेख यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रेश्मा आणि अनिताला मंगळवार पेठेतील गाडीतळ परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.