Pune Crime News : सरकारी योजनेतून ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सरकारी योजनेतून गरीब आणि गरजू मुलींना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवून ब्युटीपार्लर चालवणाऱ्या महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अविनाश कळमकर (रा. पनवेलकर होम्स कुंठावाडी अंबरनाथ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरती महेश मेहेर (वय 44, रा. विद्यानगर तींग्रे नगर) यांनी फिर्याद दिली आहे. मार्च 2018 ते जानेवारी 2020 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आरती मेहर यांचे टिंगरे नगर परिसरात ब्युटी पार्लर आहे. आरोपी अविनाश कळमकर याने फिर्यादीच्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आपण महाराष्ट्र कौन्सिल ऑफ वोकेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर या संस्थेचा संचालक असल्याचे सांगितले. गरीब व गरजू मुलींना सरकारतर्फे अनुदान मिळवून सरकारी किंवा सीएसआर योजनांमधून मोफत ड्युटी प्रशिक्षण द्यायचे आहे असे सांगितले. यासाठी तुम्हाला चांगला मोबदला व नावलौकिक मिळेल असे आमिष दाखवले.

फिर्यादीने त्याच्यावर विश्वास ठेवून प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी 35 हजार रुपये दिले. शिवाय नदीच्या आणखी दोन मैत्रिणींनी ही प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी 35, 35 हजार रुपये दिले. फिर्यादी आणि इतर दोन महिन्यांनी त्यानंतर प्रशिक्षण केंद्र सुरु करुन काही महिलांना प्रशिक्षणही दिले. त्याचा मोबदला आरोपीकडे मागितला असता त्यांनी मोबदला देण्यास टाळाटाळ केली. तसेच परीक्षेचे सर्टिफिकेट ही एका भलत्याच संस्थेमार्फत दिले. त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.