Pune Crime News : खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्समध्ये शिरलेल्या महिलांकडून सोन्याचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध तनिष्क ज्वेलर्सच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या तीन महिला चोरट्यांनी सव्वा चार लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. चार दिवसांपूर्वी कोरेगाव पार्क येथील शाखेत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी प्रकाश पोरजे (वय 34, रा. लोहगाव) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन रोडला पुण्यातील प्रसिद्ध अशा तनिष्क ज्वेलर्सची एक शाखा आहे. त्याठिकाणी तक्रारदार हे नोकरी करतात. दरम्यान 3 जानेवारी रोजी तीन महिला सोने खरेदीसाठी दुकानात आल्या होत्या. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्या दुकानात आल्या होत्या. यावेळी त्यांनी दुसऱ्या मजल्यावर बांगड्याच्या विभागात शिरल्या. तसेच सोने खरेदी करण्याचा बहाणा करत तेथून 4 लाख 18 हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने चोरून नेले.

हा प्रकार समोर आल्यानंतर तक्रारदार पोरजे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तसेच त्यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी येथील सीसीटीव्हीची पडताळणी करून शोध सुरू केला आहे. अधिक तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.