Pune Crime News :’तुला मॉडर्न मुलीसारखे राहता येत नाही’ म्हणत पत्नीचा छळ; पतीविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- ‘तू लो स्टॅंडर्ड आहेस, जर्मनीमध्ये नोकर बायका पण तुझ्यापेक्षा चांगल्या आहेत. तुला मॉडर्न मुली सारखे राहता येत नाही’, म्हणत पत्नीचा छळ करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा (Pune Crime News) दाखल करण्यात आला आहे. चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पवन योगराज ग्रोवर (वय 43, सेरेनो, पॅनकार्ड क्लब रोड, बाणेर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. सध्या तो कामानिमित्त जर्मनीत वास्तव्यास आहे.. 2006 पासून हा सर्व प्रकार सुरू होता. याप्रकरणी 41 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या उच्चशिक्षित असून त्यांचे उच्चशिक्षित असणाऱ्या पवन ग्रोवर याच्यासोबत 2006 मध्ये लग्न झाले आहे. पवन ग्रोवर हे सध्या कामानिमित्त जर्मनीत स्थायिक आहेत. दरम्यान लग्न झाल्यापासून आरोपीने वारंवार फिर्यादी यांना “तू सुंदर दिसत नाही, तू मला आवडत नाहीस, तू वेडसर आहेस, तुला मॉडर्न मुलीसारखे राहणे जमतच नाही. तू लो स्टॅंडर्ड आहेस, जर्मनीमध्ये नोकर बायका पण तुझ्यापेक्षा चांगल्या आहेत.” असे म्हणून फिर्यादी यांना माहेरी निघून जाण्यास सांगितले. पूर्णपणे बरबाद करून टाकेल अशी धमकी देऊन फिर्यादी यांना शिवीगाळ (Pune Crime News) करत छळ केल्याने गुन्हा दाखल आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.