Pune Crime News : – तलवारीने केक कापून वाढदिवस साजऱ्या करणाऱ्या तरुणाला अटक 

एमपीसी न्यूज – तलवारीने केक कापून वाढदिवस साजऱ्या करणाऱ्या तरुणाला अन त्या तलवारी बनविणाऱ्याला देखील दत्तवाडी पोलीसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून तीक्ष्ण 7 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

रितेश वाळु पायके (वय 19, जनता वसाहत), आदित्य संजय नलावडे (वय 19) व प्रेम योगेश पवार (वय 24) अशी अटक केलेल्याची नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात टोळक्यांचा नंगानाच सुरू आहे. खून झालेल्या गुडांचे वाढदिवस पिस्तूल अन कोयते हवेत नाचवत साजरे केले जात आहेत. दुसरीकडे तरूण तलवारीने केक कापून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

यादरम्यान, दत्तवाडी पोलिसांना माहिती मिळाली की “काही दिवसापूर्वी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करून त्यांचे फोटो व्हॉटसअप स्टेटस ठेवले होते. हे फोटो स्टेट्सला ठेवून दहशत निर्माण करणारे दोघे जनता वसाहतीत आले असून, त्यांच्याकडे हत्यारे आहेत. त्यानुसार, या परिसरात सापळा रचून या दोघांना पकडले. त्यांच्याकडून तलवारी देखील जप्त केल्या.

यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या तलवारी त्यांचा ओळखीमधील भोर येथील लोहार प्रेम पवार याने तयार करून दिल्याचे सांगितले. तसेच, तो लोहार सध्या आणखी तलवारी देण्यासाठी जनता वसाहतीत आल्याचे समजले. त्यानुसार, प्रेम पवार याला ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण 7 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

दोघेही जनता वसाहतीत राहतात. त्यांना या परिसरात दहशत निर्माण करावयाची आसल्याने त्यानी रितेश बाळु पायके याचा महिन्यापुर्वी जनता वसाहत डोंगराच्या बाजुला तलवारीने केक कापुन वाढदिवस साजरा केला. तसेच त्याचे फोटो व्हॉट्सअप व इतर सोशल मीडियावर अपलोड केले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.