Pune Crime News : बनावट ई – पास तयार करुन देणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे सध्या निर्बंध लावण्यात आले आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पोलिसांकडून दिला जाणारा ई पास आवश्यक आहे. पोलिसांनी बनावट ई पास तयार करून देणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे.

धनाजी गंगनमले (वय 29, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने एक वेबसाईट तयार केली होती. ई पास मिळवण्यासाठी [email protected] या वेबसाईटवर अर्ज करावा लागतो. या अर्जाची पडताळणी केल्यानंतर पोलीस पास देतात. मात्र आरोपी बनावट ई-पास देत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी फुरसुंगी येथील पापडे वस्तीत राहत असलेल्या धनाजी याच्या घरी छापा टाकला असता हा सर्व प्रकार उघड झाला.

आरोपीने आतापर्यंत अनेकांना बनावट पासची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. तो राहत्या घरातच बनावट पास बनवण्याचे काम करत होता. त्याने पोलिसांच्या वेबसाईटवरूनच ई-पास तयार केला होता. त्या खऱ्या ई-पासच्या मजकुरात फेरफार करून तो बनावट पास बनवत होता. त्या पासवर महाराष्ट्र पोलिसांच्या बोधचिन्हाचा वापरही करत होता. त्यानंतर त्या पासची विक्री केली जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.