Pune Crime News : दुचाकी घसरुन पडल्याने तरुण ठार, एक जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव दुचाकी घसरून पडल्याने झालेल्या अपघातात तरुण ठार झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात काल मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास कात्रज परिसरातील कोळेवाडीत घडला.

धीरज सुनील पाटील (वय 24, रा. पुणे) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार दीपक घेवाडकर यांनी फिर्याद दिली आहे.

काल मध्यरात्री धीरज आणि त्याचा मित्र दुचाकीवरून कात्रज बोगद्याजवळील कोळेवाडीतून जात होते. त्यावेळी भरधाव दुचाकीवरील धीरजचे नियंत्रण सुटले. त्यामुळे खाली पडल्याने धीरज गंभीररित्या जखमी झाल्यामुळे मृत्यूमुखी पडला. त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.