Pune Crime News : पार्किंगच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, हडपसरमधील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज – मोटार पार्किंगच्या वादातून 20 जणांच्या टोळक्याने तरुणाला दांडक्याने मारहाण करून त्याच्यावर कोयत्याने वार केला आहे. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय परिसरात दहशत माजवित तरुणाच्या मदतीला कोणालाही येऊ दिले नाही. ही घटना काल सकाळी साडेदहाच्या सुमारास फुरसुंगीतील संकेत विहारमध्ये घडली.

राहूल घडई (वय 23, रा. काळेपडळ )असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 20 जणांविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फुरसुंगीतील संकेत विहारमध्ये मोटार पार्क करण्यावरून राहूल घडईसह त्यांच्या वडिलांची आरोपींसोबत वादावादी झाली. त्याचा राग मनामध्ये धरून पाच जणांच्या टोळक्याने इतर 15 साथीदारांना बोलावून राहूलला दांडक्याने मारहाण केली. त्याशिवाय त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्याच्या मदतीला कोणालाही येऊ दिले नाही. परिसरात दहशत निर्माण केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.