Pune Crime News : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला म्हणून तरुणाला मारहाण 

एमपीसी न्यूज – ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला म्हणून एका तरुणाला पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. हा प्रकार 28 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भोर तालुक्यातील कापूरहोळ गावात घडला. 

याप्रकरणी अमित शिवाजी गाडे (वय 33, राहणार मराठी शाळेजवळ, कापूरहोळ, तालुका भोर, जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी रामदास जगन्नाथ गाडे, सागर राजेंद्र गाडे, प्रतीक वसंत गाडे, शरद दिलीप म्हस्के आणि प्रथमेश प्रकाश गाडे यांच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. सोमवारी तो कापूरहोळ येथील जय महाराष्ट्र हॉटेलमध्ये होता. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या आरोपींनी त्याला ‘ तू ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज का भरला’ असे म्हणून त्याला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी बांबुनी बेदम मारहाण केली. तसेच त्याला शिवीगाळ करत दमदाटी हि केली. या प्रकरणाचा अधिक तपास राजगड पोलीस करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.