Pune Crime News : पुण्यात तरुणांचा धुडगूस;14 गाड्या फोडून केले नुकसान 

एमपीसी न्यूज – पुण्यात तरुणांच्या टोळक्याने धुडगूस घालत (Pune Crime News) तलवारीने 14  गाड्या फोडून नुकसान केले आहे.परिसरात दहशत राहावी म्हणून कोंढवा भागातील टिळेकर नगरमध्ये त्यांनी हे कृत्य केले.  रिक्षा, दुचाकी, टेम्पो, चार चाकी, दुचाकी अशा विविध गाड्यांचे त्यांनी नुकसान केले.
हृषिकेश गोरे (20), सुशील दळवी (20), प्रवीण भोसले (18) असे आरोपींचे नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.हा सगळा प्रकार बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला.

 

 

Katraj Crime News : कोयत्याने वार करुन तरुणाचा मनगटापासून पंजा तोडला ;कात्रज परिसरातील घटना

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 4 दुचाकीवर 10-12 जण कोंढवा भागात असणाऱ्या टिळेकर नगर मध्ये आले आणि त्यांनी त्यांच्या जवळील असलेल्या तलवार आणि इतर हत्याराने परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या. यात 6 चार चाकी,  3 दुचाकी, 3 टेम्पो, 1 रिक्षा, 1 छोटा टेम्पो असे एकूण 14 गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.

प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी (Pune Crime News) आरोपी यांना शिवीगाळ केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आणि भागात आपले वर्चस्व टिकून राहावे म्हणून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर येत आहे
पोलिसांनी 3  जणांना अटक केली असून बाकीच्यांना शोध सुरू आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.