Pune Crime News : शिवाजीनगर, हिंगणे-खुर्दमध्ये घरफोडीत 5 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसीन्यूज : पुणे शहराच्या विविध भागात घरफोडीचे सत्र कायम असून चोरट्यांनी शिवाजीनगर आणि हिंगणे खुर्द परिसरातील फ्लॅटचे कुलूप तोडून 5 लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर गावठाणात राहणा-या सागर परमार (वय 35) यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्या-चांदीचे दागिने मिळून 3 लाख 25  हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रामदास मुंढे तपास करीत आहेत.

दुस-या घटनेत चोरट्यांनी हिंगणे-खुर्द परिसरातील आनंदविहार कॉलनीतील घरात बाल्कनीद्वारे प्रवेश करून 1 लाख 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना काल, गुरुवारी घडली असून याप्रकरणी करमवीर शर्मा (वय42) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.