Pune Crime News : गुंड गजा मारणेच्या मुळशीतील फार्महाऊसवर पोलिसांचा छापा

एमपीसीन्यूज : कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर आतापर्यंत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वारजे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गजा मारणे आणि त्याचे साथीदार सध्या फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांची चौकशी केली तर पोलिसांच्या एका पथकाने आज गजा मारण्याच्या मुळशीतील फार्महाऊसवर छापा टाकत झडती घेतली.

तुरुंगातून सुटल्यानंतर गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी पुणे मुंबई महामार्गावरून मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केले होते. याप्रकरणी आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि खालापूर येथील पोलिस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत. कोथरूड येथील पुण्यात गजा मारणे सहा त्याच्या नऊ साथीदारांना अटकही करण्यात आली होती.

_MPC_DIR_MPU_II

परंतु, तुरुंगातून जामीन मिळाल्यानंतर गजा मारणे फरार झाला. वारजे माळवाडी पोलीस दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर वारजेमाळवाडी पोलिसांनी गजा मारणे याचा कसून शोध सुरू केला. गजा मारणेशी संबंधित सर्व नागरिकांकडे याप्रकरणी चौकशी केली जात आहे.

तर आज सकाळच्या सुमारास मारणे याच्या मुळशीतील फार्महाऊसवर पुणे पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी पोलिसांनी संपूर्ण फार्महाउस पिंजून काढले. परंतु, यातून अद्याप तरी पोलिसांच्या हाती ठोस असे काही लागलेले दिसत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.