Pune Crime News : सैन्यदलाच्या परीक्षेचा पेपर लीक केल्याप्रकरणी सात जण अटकेत

एमपीसीन्यूज : भारतीय सैन्य दलात शिपाई भरती परीक्षेसाठी होणाऱ्या परीक्षेचा पेपर लीक करणाऱ्या सात जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केले. या सात जणांमध्ये सैन्यदलातील दोघांचा समावेश आहे. पुण्यातील वानवडी आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नुकत्याच झालेल्या 28 फेब्रुवारी रोजी देशभरातील तीस हजार परीक्षार्थी ही परीक्षा देणार होते. दरम्यान, हा पेपर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर संपूर्ण भारतात होणारी सैन्यदलाचे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अली अख्तरखान (वय 47), आझाद लालमोहम्मद खान (वय 37) आणि महिंद्र चंद्रभान सोनवणे (वय 37) यांना अटक करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

तर वानवडी येथील गुन्ह्यात किशोर महादेव गिरी (वय 40) माधव शेषराव गीते (वय 38), गोपाळ युवराज कोळी (वय 31) आणि आणि उदय दत्तू आवटी (वय 23) या चौघांना अटक केली आहे.

यातील कोळी आणि आवटी हे सैन्य दलातील कर्मचारी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण भारतातील 40 परीक्षा केंद्रावर 28 फेब्रुवारी रोजी रिलेशन आर्मी शिपाई या पदासाठी ही परीक्षा होणार होती. दरम्यान मिलिटरी इंटेलिजन्स सूत्रांना या परीक्षेचा पेपर फुटला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पुणे पोलिसांना याची माहिती दिली.

पुणे पोलिसांनी त्यानंतर वानवडी आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापळा रचून कारवाई करताना सात जणांना अटक केली. आरोपींकडे केलेल्या चौकशीत परीक्षेचा पेपर असलेल्या आदल्या दिवशी परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना प्रश्नपत्रिका पुरवणार होतो, असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.