Pune Crime News : धक्कादायक ! दिवे घाटातून भरदिवसा 19 वर्षीय तरुणीचे अपहरण

एमपीसीन्यूज : सीईटीची परीक्षा देऊन चुलत भावाबरोबर गावी परत निघालेल्या 19 वर्षीय तरुणीचे चार चाकीमधून आलेल्या काही तरुणांनी कोयत्याचा धाक दाखवून अपहरण केले. आज, शनिवारी सकाळच्या सुमारास दिवेघाटात ही घटना घडली.

पीडित तरुणीच्या भावाने याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही पुरंदर तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. तिचे वडील पुण्यात एका कंपनीत कामाला असल्याने फुरसुंगी परिसरात ते वास्तव्यास आहेत. त्यातील आरोपी असलेल्या आणि पठाण याने एक वर्षापूर्वी पीडित तरूणीवर बलात्कार केला होता. या प्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर आरोपी वारंवार तिला त्रास देत असल्याने पीडित तरुणी ही तिच्या मूळ गावी राहण्यासाठी गेली होती. त्यानंतर आरोपीने तिथे जाऊन या मुलीच्या कुटुंबियातील लोकांना मारहाण केली होती. या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, या पीडित तरुणीची पुण्यात दोन ऑक्टोबर रोजी सीईटीची परीक्षा होती. परीक्षा संपल्यानंतर आज, शनिवारी सकाळी ती चुलत भावा सोबत दुचाकीवरून मूळ गावी निघाली होती. दिवेघाटात पोहोचल्यानंतर एका चार चाकी मधून अनिस पठाण हा इतर आरोपी सोबत याठिकाणी याला. त्याने दुचाकीवरून कोयत्याचा धाक दाखवून पीडित तरुणीचे अपहरण केले.

या तरुणीच्या भावाने लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.