Pune Crime News : ‘त्या’ महिलेच्या खुनाचा अखेर उलगडा, दुसऱ्यासोबत बोलत असल्याच्या कारणावरून केला होता खून

एमपीसीन्यूज : विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लोहगाव परिसरात एका महिलेचा डोक्यात दगड घालून खून करण्यात झाल्याची घटना उघडकीस आली होती. या महिलेचा चेहरा छिन्नविच्छिन्न करण्यात आल्यामुळे ओळख पटत नव्हती. अखेर पोलिसांनी काही तासातच या प्रकरणाचा छडा लावला असून खून करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरती राठोड (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी संतोष राठोड (वय 33) याला अटक केली आहे. मयत महिला आणि आरोपी बिगारी कामगार होते. एकत्र काम करत असल्यामुळे त्यांची ओळख झाली होती.

परंतु ही महिला दुसऱ्या व्यक्ती सोबत बोलत असल्यामुळे त्यांच्यात भांडण झाले होते. त्यामुळे याच रागातून संतोष राठोड याने आरती राठोड हिचा खून केला. त्यानंतर ओळख पटू नये यासाठी चेहरादेखील विद्रूप केला होता.

ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेचे फोटो आणि वर्णन त्या परिसरातील काही नागरिकांना दाखवले होते. त्यावरून या महिलेची ओळख पटली. त्यानंतर आरोपी आणि ती महिला एकत्र काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

तिचा खून झाल्यापासून आरोपी देखील बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी शोधून राबवून आरोपीला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.