Pune Crime : आयुर्वेद बॉडी ट्रिटमेंटच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणा-या एकास अटक, तीन पीडित महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – आयुर्वेद बॉडी ट्रिटमेंटच्या नावाखाली चालू असण-या वेश्याव्यवसायावर छापा टाकून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे तर तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी (दि.9) ही कारवाई केली आहे.

दामाजी उर्फ करण मुरडे (वय 38) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुरडे हा स्वारगेट येथील शहाज कॉम्प्लेक्स या ठिकाणी आयुर्वेदा बॉडी ट्रिटमेंट सेंटरच्या नावाखाली मुलींना वेश्याव्यवसायासाठी आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेत होता. गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी याबाबत माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी अचानक छापा टाकून आरोपी मुरडे याला अटक करून तीन पीडित महिलांची सुटका केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.