Pune Crime : आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या घरावर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – खंडणी, फसवणूक, बेकायदा सावकारी यासारखे अनेक गुन्हे दाखल असलेला, सध्या फरार असलेला आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या घरावर पुणे पोलिसांनी आज छापा टाकला.

पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. या धाडसत्रातून पोलिसांनी बनावट कागदपत्र, शिक्के आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. रवींद्र बऱ्हाटेसह त्याच्या नातेवाईकांच्या घरावरही ही पोलिसांनी धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे. शनिवार पेठ, बिबवेवाडी, कोंढवा धनकवडी अशा वेगवेगळ्या भागात पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. बुधवारी पहाटेपासून ही कारवाई सुरू आहे.

रवींद्र बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये आठपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. कोथरूड पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून रवींद्र बऱ्हाटे हा फरार झाला आहे. कोथरूड पोलिसांनी त्याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट काढले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III