Pune Crime : पुण्यातील बस स्टॉप गेला चोरीला ; पोस्टर झाले व्हायरल

एमपीसी न्यूज – पुण्यातील एक बस स्टॉप चोरीला गेल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यातील बी. टी. कवडे रोडवरील देवकी पॅलेससमोरील बस स्टॉप चोरीला गेल्याचा दावा या पोस्टरमध्ये करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, बस स्टॉप शोधणाऱ्याला पाच हजार रुपयांचं बक्षीस देणार असल्याचंही पोस्टर मध्ये म्हंटले आहे. सोशल मीडियावर हे पोस्टर चांगलेच व्हायरल झाले असून अनेकांनी त्याला शेअर केलं आहे. काही नेटकऱ्यानी ‘पुणे तिथे काय उणे’ अशी कमेंट या पोस्टरवर केली आहे.

‘बी. टी. कवडे देवकी पॅलेससमोरील पुणे महानगर परिवहनचा नागरिकांच्या सोयीचा बस स्टॉप चोरीला गेला आहे. कोणाला दिसल्यास संपर्क साधा रोख 5000/- रुपये बक्षीस देण्यात येईल.’ असा मजकूर या पोस्टर वर लिहिण्यात आला आहे. दरम्यान हे पोस्टर राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत म्हस्के यांनी लावले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.