Pune Crime : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचे पोलीस कोठडीतून पलायन

एमपीसी न्यूज – बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीने पोलीस कोठडीतून पलायन केल्याची घटना उघडकीस आली. अलंकार पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत हा आरोपी होता. गुरुवारी सायंकाळी त्याने पलायन केले.

अलंकार पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय गणेश चव्हाण (वय 19) असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन मनोहर बुधावले यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय चव्हाण याच्या विरोधात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्याला अलंकार पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली होती. गुरुवारी सायंकाळी त्याला तपास पथकाच्या खोलीमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु फिर्यादी यांचा डोळा लागल्याचे पाहून त्याने पोलीस कोठडीतून पलायन केले.

काही वेळाने पोलिसांनी तो पोलिस कोठडीत दिसत नसल्यामुळे शोधाशोध केली परंतु तो सापडला नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.