Pune Crime : रिक्षाचा धक्का लागल्याने रिक्षा चालकाचा खून

एमपीसी न्यूज : पेट्रोल पंपावर गॅस भरण्यासाठी गेलेल्या (Pune Crime) रिक्षाचा दुचाकीला धक्का लागल्याने झालेला भांडणात रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली. यामध्ये तीस वर्षीय रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण दांडेकर (वय 30) असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अरबाज मेहबूब शेख (वय 25) आणि मुखीम गफूर शेख या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांनाही अटक केली आहे. मधुकर राजू दांडेकर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Pune News : पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतुकीत बदल

याप्रकरणी अधिक माहिती अशी की मयत किरण दांडेकर हा फिर्यादी यांचा भाऊ आहे. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे भाऊ आणि इतर मित्रासह रिक्षात गॅस भरण्यासाठी जात होते. यावेळी त्यांच्या रिक्षाचा धक्का दुचाकीवरून जाणाऱ्या अरबाज शेख याला लागला.

याच कारणावरून आरोपीने किरण दांडेकर यांच्या (Pune Crime) छातीवर लाथ मारली. यामध्ये बेशुद्ध होऊन किरण याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.