Pune Crime : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीची मध्यप्रदेशात विक्री; पुणे पोलिसांनी केली सुटका

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीला पुण्यातून पळवून नेऊन (Pune Crime) मध्यप्रदेशमध्ये विकणाऱ्या 2 आरोपींना मध्यप्रदेशमध्ये जाऊन पुणे पोलिसांनी अटक केली. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीसोबत हा प्रकार घडला.

शांती उर्फ सांतो हरनाम कुशवाह (वय 40) आणि धर्मेंद्र यादव (वय 22) असे या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलीची मोठी बहीण पुण्यातील एका वर्कशॉपमध्ये काम करत होती. त्यावेळी या तरुणीची ओळख शांतीसोबत झाली. शांतीने या तरुणीला तिच्या आवडीच्या असलेल्या मुलाशी लग्न लावून देते, असे खोटे आश्वासन देऊन तिला मध्यप्रदेश या ठिकाणी नेले.

त्या ठिकाणी शांतीने या तरुणीचे जबरदस्तीने अवघ्या 50 हजार रुपयांसाठी धर्मेंद्र यादव या आरोपीशी लग्न लावून दिले. दरम्यान, यादवने शांतीला लग्न करण्यासाठी एक मुलगी (Pune Crime) शोध आणि पैसे घे असे सांगितल्याने हा सगळा प्रकार शांतीने केला.

Pune : क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील बेपत्ता

पोलिसांनी या तरुणीचा शोध घेण्यासाठी मध्यप्रदेश गाठले आणि आरोपींना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.