Pune Crime : चंदन चोरट्यांचा पुणे शहरात उच्छाद; चंदनाची चार झाडे चोरून नेली

एमपीसी न्यूज : चंदन चोरट्यांनी पुणे शहरात उच्छाद मांडला (Pune Crime) आहे. शहरातील मोक्याच्या आणि संवेदनशील समजणाऱ्या परिसरातूनही या चोरट्यांनी चंदनाची झाडे चोरून घेण्याचा प्रकार यापूर्वी अनेकदा घडला आहे. त्यानंतर आता या चोरट्यांनी पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पुन्हा क्लबमध्येही दरोडा टाकून चंदनाची चार झाडे चोरून नेली. हे करताना या चोरट्यांनी पुन्हा क्लबच्या सुरक्षारक्षकांना करवतीचा धाक दाखवला. बुधवारी पहाटेच्या सुमारास जवळपास तासभर हा थरार सुरू होता.

याप्रकरणी 33 वर्षीय सुरक्षा रक्षक अजित घाडगे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, पाच अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दि पुना क्लब हाऊस येथे सुरक्षा रक्षक आहेत.

दरम्यान, ते नेहमीप्रमाणे त्यांच्या ड्युटीवर होते. त्यावेळी पहाटे चारच्या (Pune Crime) सुमारास पाच अनोळखी व्यक्ती येते आल्या. त्यांनी तक्रारदारांना करवतीचा धाक दाखविला. तसेच, क्लबमध्ये घुसून तेथील 80 हजाराची 4 चंदनाची झाडे कापून चोरून नेली. त्यानंतर पाचही दरोडेखोर तेथून पसार झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Pune : जीवनसाथी डॉट कॉमवरची ओळख पडली महागात; तरुणींना 23 लाखांचा गंडा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.