Pune Crime : ससून रुग्णालयात चप्पल घालून जाण्यास मज्जाव केल्याने आरोग्य अधिकाऱ्याला धक्काबुक्की

0

एमपीसी न्यूज – ससून रूग्णालयातील अपघात विभागात चप्पल घालून जाण्यास मज्जाव केल्याचा राग आल्यामुळे तिघांजणांनी सीएमओ अधिका-याला धक्काबुक्की करीत कार्यालयात तोडफोड केली. त्याशिवाय सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी तिघाजणांना अटक केली. ही घटना काल दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

सोहन पवार (वय २३), योगेश वाघमारे (वय २२), सूरज वाघमारे (वय २० सर्व रा. ताडीवाला रस्ता ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शंकरलाल चौधरी (वय २५ रा. कॅम्प ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरलाल ससून रूग्णालयात सीएमओ पदावर कार्यरत आहेत. काल ते ड्युटीवर असताना सोहन, योगेश आणि सूरज त्यांच्या नातेवाईवाला भेटण्यासाठी रूग्णालयातील अपघात विभागात आले होते. त्यावेळी शंकरलाल यांनी त्यांना अपघात विभागात चप्पल आणि बूट घालून जाण्यास विरोध केला. त्याचा राग आल्यामुळे तिघांनी मिळून शंकरलाल यांना धक्काबुक्की करून कार्यालयाची तोडफोड केली. त्याशिवाय सुरक्षारक्षकाला मारहाण केली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III