Pune Crime News : महाराज पैसे देत असल्याचे सांगून महिलेचे दागिने चोरले

एमपीसीन्यूज : स्वारगेट बसस्थानक परिसरातून पतीला डबा घेउन रस्त्याने पायी चाललेल्या महिलेला तिघाजणांनी थांबविले. गरिब लोकांना महाराज पैसे वाटत आहेत, अशी बतावणी करीत त्यांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर आरोपींनी महिलेच्या गळ्यातील 34 हजारांचे दागिने स्वतःकडील पिशवीत घेउन फसवणूक केली आहे.

याप्रकरणी विजया वाडकर (वय 50 ) यांनी स्वागरेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विजया पायी स्वारगेट बसस्थानक परिसरातून पतीला डबा देण्यासाठी चालल्या होत्या. त्यावेळी एकाने त्यांना थांबविले.

‘मावशी येथे गरिब लोकांना महाराज पैसे वाटत आहेत’, अशी बतावणी करीत त्यांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर आरोपीने विजया यांना कात्रज बसस्थानक परिसरात नेउन तेथील दोघांशी ओळख करून दिली. त्यानंतर तिघांनी विजया यांना तुमच्या गळ्यातील दागिने पाहिल्यानंतर महाराज तुम्हाला पैसे देणार नाहीत, असे सांगून त्यांच्या गळ्यातील 34 हजारांचे दागिने स्वतःकडे घेतले.

त्यानंतर आरोपींनी हातचलाखी करून ताब्यातील दागिन्यांची पिशवी न देता फसवणूक केली आहे.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. शेख तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.